सोनल बशीरे
📝 📝
उल्हासनगर महानगर पालिका ट्रॅफिक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने केबी रोड वरील चार चाकी गाड्यावर कारवाई केली जाते..दंड ही वसुल केला,जातो..
परंतु नंतर काही तासातच सदर कार विक्री आणी घरेदी करणारे व्यापारी परत् तुटे गाड्या उभ्या,करतात..आणी पोलीस...महानगर पालिका प्रशासनाची इज्जत काढतात..अनेक,वेळा हे व्यापारी प्रभाग अधिकारी यांच्याशी हमरितुमरीवर् येऊन.. तोंडची दादागिरी करतात...
परंतु ये रे माझ्या मागल्या सारखा,प्रकार नेहमी चालतो....
17 सेक्शन चौक मोबाईल गल्ली। इथे तर लोखंडी ग्रील टाकून दुकानदारानि सदर जागेचा 7/12 काढल्यासारखे वागतात..यांच्यावर कारवाई कधी होतच नाही..प्रभाग अधिकारी या रस्त्यावरून रोज नेहमी ये जा करतात..परंतु वातानू कुलीत गाडीची काच खाली येत नसेल...त्यामुळे काही दिसत नाही.....उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी फुटपाथ गिळंक्रुत् केला गेला आहे..त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण.कॅम्प तीन येथून,स्टेशन कडे जाणरा रस्ता ..दोनीही बाजूच्या दुकानादारांनी फुटपाथ वरती पुतळे उभे करून रस्ता 8 फुटाचा केला.आहे..येणारे जाणारे नागरिक.रिक्षा चालक मोटर चालक यांना नागरिकांना धक्के देत गाड्या चालवाव्या लागतात..अनेकदा इथे मारमाऱ्या झाल्या,आहेत..परंतु हे दुकानदार आपली,मुजोरी सोडत नाहीत। अनेकदा पालिका अधिकारी यांना सांगून ही,टाळाटाळ का केली जाते,याचे उत्तर आदरणीय आयुक्त अजीज शेख यांनी द्यावे..
सदर स्टेशन जवळील फुटपाथ मोकळा,करून नागरिकांना बहाल,करावा अशी जोरात मागणी केली जात आहे..
आता आयुक्त साहेब यावर कारवाई करतात की...दुकानदारासाठी ती जागा.बहाल.करतात हे पाहणे गरजेचे आहे..
सद्या तरी कित्येक वर्ष हा फुटपाथ दुकांदारांनी हडप केला.आहे..
...
🌈🌈
दी पॅन्थर टाइम्स
🌈🌈