5 वर्षात काय केले?.आता आयुक्तांच्या भेटी घेणारे लोक प्रतिनिधी

 सारा गाव मामाचा एक नाही कामाचा..

कैलास साबळे

      📝📝

या म्हणीच्या अनुसार उल्हासनगर महानगरपालिकेचा कारभार् चालू आहे...


मागील महिन्या भरापासून उल्हासनगर महा नगर पालिकेचे मा,आयुक्त अजीज शेख यांच्या भेटी घेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेतेतील पदाधिकारी,आणी आमदार बालाजी किणीकर सातत्याने हजेरी लावत आहेत,आता तर स्पर्धा चालू झाली आहे..आमदार कुमार आयलानी,आमदार गणपत गायकवाड,.. आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पंचम कलानी,यांनी देखील आयुक्तांशी भेटून चर्चाच केली,. शहरात अनेक राजकीय पक्ष आहेत,ज्यामध्ये आंबेडकरी विचारांचे देखील राजकीय पक्ष आहेत,परंतु, सध्या त्यांचे राजकारणातील आस्तित्व लोप पावत आहे,गटातटात असलेले आंबेडकरी पक्ष यांचा प्रशासनावरील वचकच मुळात मृत पावला आहे,



नागरिकांच्या समस्या सोडवण्यात सर्वच पक्ष हतबल आहेत,कारण जनतेच्या हक्कासाठी लढण्याकारिता स्वतः निस्वार्थ असणे गरजेचे आहे..शहरातील अनेक अडचणी आणी विकास यावरती लढण्याकरिता शहरातील नगदसेवक्/सेविका असमर्थ आहेत्, कारण तडजोडीवर पंचवार्षिक दिवस काढलेले ,कोणत्याही मुद्द्यावर आक्रमक होऊ शकत नाहीत,.नगरसेवक पदाचा कार्यकाल संपला असल्याने आता फक्त व्यक्तिगत संबंधाने कामे करू पाहत आहेत, राहिली गोष्ट आमदारांची तर शहरासाठी ते कितपत आक्रमक आहेत,ते धोकादायक इमारतिच्या मुददयावरुनच सार्वजनिक झाले आहे ...उल्हासनगर महानगर् पालिकेतील चार ही प्रभागातील अधिकारी आणी नोडल अधिकारी, अनधिकृत बांधकाम थांबवण्यास असामर्थ आहेत,मुळात ते चार ही अधिकारी शहरातील नेत्यांना आणी आमदारांना जुमानत् नाहीत.त्यामुळे बेकायदा बांधकाम चालूच राहतील,ज्यामध्ये अनेक नगद्सेवक लिप्त आहेत, 


पाण्याच्या प्रश्नावर सगळेच लोकप्रतिनिधी हतबल आहेत,त्यांना पाणी.वितरण विभागातील कोणताच अधिकारी आणी कर्मचारी भाव देत नाही..

आयुक्त साहेबांच्या बैठकीमध्ये आमदार बालाजी किणीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणी नगर रचनाकार यांना खडे बोल सुनावले,त्यावेळी सोळंके,आणी मुळये यांनी एकदुसऱ्यावर खापर फोडून आमदार किणींकर यांच्या प्रश्नांना केराची टोपी दाखवली.आरोग्य आणी स्वच्छता यावर तर बोलूच नये.

शहरात सगळीकडे कचऱ्याचा ढीग लागलाय,परंतु नगद सेवकांनी ( क ) मिशन टेबलखाली बाळगल्याने त्यांना बोलता येत नाही,,..

मुद्दा आहे,आयुक्तांच्या भेटी गाठी चा..लोकप्रतिनिधी कोरोना काल सोडला तर ,,काय करत होते?...

सन्मानीय आयुक्त साहेब सध्या तरी शहरा साठी नवीन आहेत,परंतु आल्यापासून आपल्या कर्मचारी आणी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अनेक कार्याला गती दिली आहे,.रोखप्रतिनिधी आजा ही फंडासाठी एरझाऱ्या मारत आहेतच,..



जनतेच्या कामासाठी 5 वर्षात किती वेळा पालिकेत आले हा संशोधनाचा विषय आहे,.

(क) मिशन साठी सार्वजनिक बांधकाम खात्यात पडून असणारे नगदसेवक जनतेसाठी काय काम करू पाहत आहेत,याकडे ही आयुक्तांना लक्ष केंद्रित करने गरजेचे आहे

एक टिप्पणी भेजें

[facebook][disqus]

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget