निवडणूकित उमेदवाराने त्यांच्या घोषणापत्रात गुन्ह्याची माहिती सार्वजनिक करावी


 कैलास साबळे,

📝📝

केंद्रीय निवडणूक आयुक्त मा,राजीव कुमार,

सन्मानीय, लोकशाही मध्ये निवडणुक ही अत्यंत मह त्वाची प्रक्रिया आहे, निवडणूकी मध्ये उतरण्यासाठी ,समाजसेवक/सेविका यांच्यासोबत ज्यांचा जनहिताशी सुतराम संबंध नसतो, असे आयराम गयाराम आणि अनेक व्यावसायिक प्रतिस्पर्धी मैदानात उतरतात आणि साम, दंड, भेद,यांच्या जीवावर जनतेला नको असणारे देखील निवडणुकीत यश संपादन करतात,मतदाता यांना ,लुभावून, वेळ प्रसंगी धमकावून, बूथ अपहरण करून, एक ना अनेक क्लुप्त्या लढवून नकारात्मक लोकं देखील पंचायत समिती पासून ते खासदारकी पर्यंत झेप घेतात, सगळेच बलशाली आणि दबंग नसतात,, परंतु अनेक दबंग आणि असामाजिक तत्व राजकारणात आता पाय रोवू लागले आहेत, देशाच्या प्रत्येक गावापासून ते प्रत्येक शहरापर्यंत आता हे चित्र दिसत आहे,

निवडणुकी प्रक्रिये मध्ये उमेदवारास अर्ज भरताना अनेक बाबी निवडणूक आयोगास लेखी स्वरूपात द्याव्या लागतात ज्या मधे,

*मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा*

*आधार कार्ड ची प्रत*

संपत्तीचे विवरण(प्रतिज्ञापत्र)

सन 2001 नंतर तीसरे अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र

मनपा चा ठेकेदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र

महानगरपालिकेचे नो ड्युवस प्रमाणपत्र

आरक्षित जागा असेल तर जात प्रमाणपत्र

दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास निवडणूक लढवता येत नाही

इत्यादी,

  ,मुद्दा हा आहे की, उमेदवार हे निवडणूक आयोगास माहिती देतात, या मध्ये ते पात्र झाल्यास निवडणूक लढतात, अथवा अपात्र झाल्यास निवडणूक लढवता येत नाही,, परंतु मतदान हे जनतेला करायचे असते..

ज्या प्रमाणे उमेदवार निवडणुकीत स्वताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घोषणा पत्र बनवतात त्यामध्ये उमेदवारांच्या संपत्ती सोबत किती गुन्ह्यात दोषी आणि किती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत हे देखील क्रमप्राप्त करावे जेणेकरून मतदाता कोणाला मतदान करतोय, आणि कोणत्या पक्षाने अश्या गुन्हेगारास निवडणूक लढण्यास तिकीट दिली हे सार्वजनिक होईल,,, अश्यामुळे जर असे गुन्हेगार उमेदवार जिंकून आले तर,जनतेला ही पश्चाताप करायची गरज पडणार नाही की ,त्यांनी गुन्हेगारास आपल्या मर्जीनुसार मतदान केले,,

सन्मानीय आयुक्त साहेब, नोकरी साठी कॅरेक्टर प्रमाणपत्र द्यावे लागते तसेच, निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारास ही कॅरेक्टर प्रमाणपत्र क्रमप्राप्त करावे, लोकशाही वाचवण्यासाठी आपण ही हातभार लावावा ही नम्र विनंती,,,

एक टिप्पणी भेजें

[facebook][disqus]

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget