उल्हासनगर महानगर पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांनी व्यापारी असोसिएशन आणि नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन प्लास्टिक बंदीसाठी आवाहन केले होते…..
परंतु पैश्याच्या हव्यासापोटी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी काही प्लास्टिक कारखानदार अजून ही कायद्याला न जुमानता छुपे कारखाने चालवत आहेत,,,
असाच एक व्यक्ती कॅम्प नंबर 3 येथील मुरली कंपाउंड जवळ,ममता एंटरप्राइजेस नावाचा प्लास्टिक कारखाना चालवत होता,,,
उल्हासनगर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे निरीक्षक एकनाथ गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांना सदर माहिती मिळताच त्यांनी ,या कारखान्यावर कारवाई करत तब्बल एक टन प्लास्टिक जप्त केला, आणि कारखानदारावर 5 हजाराचा दंड लावला.
मुळात प्लास्टिक बंदी असताना ,आणि वारंवार समज देऊनही कारखानदार थोड्याश्या दंडामुळे असे उद्योग करत असतील तर सदर कारखाने सील करून मालकावर कायदेशीर कारवाई करावी ,तेंव्हाच ते अशी चूक करणार नाही,,....
सोनल बशिरे
📝
एक टिप्पणी भेजें