मंत्रिपद जाताच रस्त्यावरील खड्डे लागले दिसायला


 मंत्रिपद जाताच रस्त्यावरील खड्डे  दिसायला लागले,,,राज्याचे माजी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर असलेल्या खड्ड्याची जाण आली ,आणि त्यांनी पाहणी सुरू केली,, गेली आडीज वर्ष याच रस्त्यावरून जाताना हे खड्डे अथवा घायाळ झालेले रस्ते दिसले नाहीत, ठाणे जिल्ह्यात सातत्याने येणे जाने असताना कधी रस्त्यावरील खड्डे दिसलेच नाहीत,,उल्हासनगर असताना राष्ट्रवादिचे अर्धे मंत्री येत जात होते,त्यांना ही कधी उल्हासनगर चे खड्डे दिसले नाहीत, कदाचित सत्तेच्या चष्म्यातून खड्डे दिसत नसतील,सत्ता जाताच सर्व काही दिसु लागले,,,, उल्हासनगर सत्तेत असलेल्यांसाठी अथवा विरोधकांसाठी सहल असते, एखादी घटना घडली की येतात पाहणी करतात, माध्यमांना बाईट देतात, स्थानिक नेते त्यांच्यासोबत चमकेशगिरी करतात, आणि समस्या जैसे आहे तैसीच राहते, जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असूनही उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीचा तोडगा काढू शकले नाहीत,, आज ही लोकांचा जीव टांगणीला आहे,,परंतु, रस्त्याची पाहणी करण्याचा देखावा ते टाळू शकले नाहीत, उल्हासनगर मधील चमकेशवीर नेते अजूनही अश्या नेत्यांच्या भरवश्यावर लोकाना झांसा देत आहेत,हे जनतेचे दुर्दैव्य,,

एक टिप्पणी भेजें

[facebook][disqus]

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget