भीमा,,
माफ कर आम्हाला,,,🙏
आमच्यासाठी आयुष्यभर झिजलास तू, जनावरांच्या जीवनातून उचलून माणुसकीच्या सिंहासनावर आम्हाला आसिन केलेस तू, पण आम्हाला जान नाही राहिली त्याची, आम्ही शिक्षणासोबत स्वार्थीही झालो,, तू आम्हाला वाघ बनवले, परंतु लालचिपणा आणि स्वताचा विचार करण्याच्या लायकी मुळे आम्ही आज ही बिन शेपटाचे श्वानच राहिलो,, स्वाभिमान कशाला म्हणतात हे आम्ही फक्त लोकांना सांगतो पण आम्ही आज ही जातीयवादि लोकांच्या उंबरठ्यावर रोज नाक रगडतो, आम्हि जातीयवादी लोकांना पोक येऊ पर्यंत वाकून जी हुजुरी करतो, परंतु आपल्या समाजातील लोकांना गळाभेट करायला लाज वाटते,, शिका ,संघठित ,व्हा संघर्ष करा,,
हे तू आम्हाला सांगितले,, आम्ही शिकलो, पण संघठीत नाही राहू शकलो, कारण आम्हाला आमच्या समाजातील लोकांचे नेतृत्व मान्य नाही, आम्ही जातीयवादि पक्षात जाऊन झेंडे बॅनर ,पोस्टर लावतो, या मग स्वताच अध्यक्ष बनून स्वताचे नवीन दुकान उघडतो, दिमतीला दोन कार्यकर्ता जरी नसले ,तरी आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष ची पाटी गळ्यात बांधून फिरतो,,आम्ही तुझ्या निळ्या झेंड्याला फक्त ढाल बनवतो, परंतु सत्ता हस्तगत करण्यासाठी कधी संघर्ष करत नाही, मुळात एकत्र येतच नाही, कारण आम्हाला गुर्मी आहे, आम्ही शहाने आहोत, आमच्या समाजापुढे आम्हाला वाकता येत नाही ,परंतु हड्डी मिळेल म्हणून आम्ही जातीयवादी लोकांच्या पायावर लोटांगण घालतो,,तुझा दिन दुबळा समाज आता तुझ्या मुळे निवडणुकीच्या दिनी राजा जरी असला, तरी बाकी दिनी तो रंकच आहे,, कारण तू दिलेल्या मतदानाच्या हक्काचा वापर तो हाथ ओले करून देतो,,सगळाच समाज तसा नसला तरी बाकीच्या मुळे विकला जाणारा समाज म्हणून आमची ख्याती आहे,,आम्ही महापरिनिर्वाण दिनी तुझ्या दर्शनासाठी येतांना, चैत्यभूमीवर ही वेगवेगळी दुकाने थाटतो, देशभरातून येणारी दिन दुबळी जनता ही फक्त तुझ्या दर्शनासाठी येते,पायात वान जरी नसले तरी डोक्यावर तुझा फोटो ठेऊन शेवटच्या श्वासापर्यत तुझे उपकार मानणारे तुझे अनुयायी तासनतास रांगा लावून उपाशीपोटी तुला नमन करते,परंतु आम्ही इतके बेशरम आहोत की, आम्ही आमचेच मोठे मोठे बॅनर लावून स्वताची चमकेशगिरी करत असतो,, आम्हाला जरा ही लाज नाही, आम्ही विसरतो की ही जनता तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ आहे, आमची थोबाडे बघण्यासाठी ते येत नाहीत,, आम्ही इतके निर्लज्ज आहोत की तुझ्या पायतानाची लायकी नसताना, बॅनर वर तुझ्या फोटो सोबत स्वताचे फोटो लावतो आणि आम्हाला त्याचा आभिमान वाटतो,, मुळात आज ही आमच्या गळ्यात स्वार्थाचे मडके आणि कंबरेला चापलुसीचा झाडू आहे, तुझ्यामुळे नोकरी मिळाली, अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, नगरसेवक, सभापती झालो, परंतु आंबेडकरी अजूनही होता आले नाही,,आजही कित्येक आंबेडकरी आहेत समाजात पण ते कमी पडतात तुझ्या स्वप्नाचा भारत बनवण्यास, असमानता अस्पृश्यता आज ही कायम आहे, कारण आम्ही शिकून स्वता साठी जगतोय,समाजाला काही देण्यासाठी आम्ही आज ही षंढ आहोत,किती ही मोठे पराक्रमी असलो तरिही तुझे नाव घेतल्याशिवाय आजही आमची लायकी नाहीये,परंतु तुझ्या विचारावर चालायची आम्हाला अजुनही आदत नाहीये,, कदाचित ,येणारा काळ आम्हाला परत गुलामी पत्करायला लागेल,,त्यावेळी आम्हाला माणसात आणण्यासाठी कोणीच नसणार,मग हे राष्ट्रीय अध्यक्ष स्वताला कसे वाचवणार हे त्यांचे त्यांनी बघून घ्यावे,,,
आम्ही जयंतीला एकत्र दिसतो पण त्यातही अनेक वेगवेगळ्या संघटना आणि पक्षाचे पट्टे गळ्यात बांधलेले असतात, आणि पट्टा काय दर्शवतो हे सांगण्याची गरज नाहीये,, ,,भीमा,तुला जाऊन 66 वर्ष झाली परंतु आमच्यातला मी पणा अजून ही गेला नाही, आणि जाणार ही नाही, कारण आम्ही स्वार्थी आहोत, स्वतःसाठी जगण्याची वृत्ती आमच्यात भिनली आहे,तुझा त्याग, बलिदान,आम्ही विसरलो,,,,
सरतेशेवटी जो पर्यत समाजातील प्रत्येक घटक एकत्र येत नाही, आणि हे राष्ट्रीय अध्यक्ष स्वताची दुकाने बंद करून एका मंचावर येत नाहीत, तो पर्यत आम्ही असेच आमच्या बापाचा कायदा आहे म्हणून फक्त उर बडवून घेणार, आणि जातीयवादि लोकं याचा फायदा घेणार,
📝
कैलास साबळे
दि पँथर टाईम्स
8007961970
एक टिप्पणी भेजें