📝
अजुनी किती पाहू मी वाट
पाखरानो, आता तरी या एका घरट्यात,
डॉ, भिमाराव रामजी आंबेडकर,
बहु( त)जन
मला माझ्या समाजातील लोकांशी हितगुज नको,, मी माझ्या थोर व्यक्तीला नेता माननार नाही, ,,
मी माझ्या समाजातील मान्यवरास मान देणार नाही,,जातीयवादी पक्षातील नेत्यांच्या पायावर लोटांगण घालीन,त्यांच्या उंबरठा जिभेने स्वच्छ करेन, ,,
शेकडो च्या हिशोबात स्वयंभू आंतराष्ट्रीय अध्यक्ष नेते आहेत, थोर आणि महान फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याबाबाबत सांगून आपली चमकेशगिरी करता येते, परंतु आपण समाजासाठी काय करतो, हे सांगता येत नाही,,, सगळ्यांची वेगवेगळी चूल, विश्वरत्न,महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा संदर्भ देऊन प्रसिद्धीच्या पटलावर आल्यावर समाजासाठी काय करत आहात याचे आत्मचिंतन करावे,,, शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा,, हे फक्त कागदावरच?, संघटित म्हणजे ?, अरे तुम्ही बहुनांच्या नेत्यांनी संघटित व्हा फ़क्त, आम्ही आंबेडकरी संघटित आहोत,तुमच्यामुळे वाटले गेलो आहोत,,, पद ,प्रतिष्ठा, यासाठी दुसऱ्याच्या ताटाखलचे मांजर बनता,, सरे आपल्याच लोकांमध्ये मिळून वाघ बनायला कसली लाज?
गेली 7/8 दशके सत्ता नाहीये,, मग आपण उपाशी मारतोय का?, बापाने आरक्षणासोबत स्वाभिमानाने जगण्यासाठी नक्कीच तरतूद करून ठेवली आहे, आज बहुजनांचे करोडो शिक्षित युवक स्वताच्या जीवावर जगतात,त्यांना ही वाटते आंबेडकरी युग यायला पाहिजे, कशात कमी आहोत आपण? शिक्षणात,बुद्धीत, बळात, ,, सगळ्याच पातळीवर आज बहुजनांची लेकरं बाप आहेत, घोडे पेंड खातेय फक्त, आपल्या माणसात मिसळण्यासाठी,,अरे एकदा ते झेंडे आणि काठी बाजूला ठेऊन बाबासाहेबांच्या विचारासाठी एकत्र या,आणि बघा आपली ताकत, जिथे एक निळा फडका वातावरण बदलू शकतो,तिथे तुमचा एकोपा काय काय करेल? बहुजनांच्या नेत्यांनी आता स्वताला आवरावे, या मग एकत्र यावे, नसू द्या सत्ता पुढील 5 वर्ष, एकदा एकत्र येऊन तर बघा, नाहीतरी गटातटात असून सत्तावीरहतच आहात,,। विरोधकांच्या चाकरी करण्यापेक्षा समाजासाठी एका मंचावर या, अन्यथा पुढील काळात बहुजनांचा शिक्षित युवक तुम्हाला लाथाडेल, तो युवक कोणाचाही बांधील नसेल,,,,,,।।,,,
नाहीतरी तुमच्या वेगवेगळ्या गटातटामुळे आम्ही काय मिळवले हे सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेच आहे,,
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणारा महासागर हा फक्त आणि फक्त बाबासाहेबांसाठी येतो,ज्यामध्ये रांगत असणाऱ्या बाळापासून काठीचा आधार घेत चालणाऱ्या ,आयुष्याची संध्याकाळ असलेले वृद्ध असतात,,तिथे यायला जसे कोणत्या नेत्याच्या बोलावण्याची गरज नसते, पण येतात, बाबासाहेबानी जनावरसारख्या जीवनानातून मानवासारखे दिलेल्या जीवनामुळे ,येतात, येत राहतील, तसेच एक दिवस आंबेडकरी तरुण एकत्र येणारच, समाजाच्या ठेकेदारानो, त्यावेळी तुम्हाला कोणी विचारणार नाही,अजून वेळ गेली नाही, या एकत्र या ,अन्यथा घरी बसा
तूर्त इतकेच,-----
कैलास साबळे
8007961970
📝
एक टिप्पणी भेजें